दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-पोले विष्णु मोहन.
अहमद्पुर: तालुक्यातील हागदळ येथील समाजिक कायकर्ते धनंजय पटूस सुरनर यांचं समाजिक कार्य,चळवळीत कार्य करण्याची क्षमता,संघटनात्मक दर्जा वाढवण्याची कला आणी आता पर्यंतच्या कार्याची दखल घेत यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष श्री संजय वाघमोडे साहेब यांच्या उपस्तीथीत धनंजय पटूस सुरनर यांची संघटनेच्या अहमदपूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यावेळी बोलताना धनंजय सुरनर म्हणाले की माझ्या वर संघटनेने सोपवलेल्या जबाबदारीला मी चांगल्या प्रकारे न्याय देईल आज पर्यंत जे शोषित,वंचित, गरीब,दिन दलित, बहुजनासाठी जे काम केल त्याला पुढे नेण्यासाठी यशवंत क्रांती संघटनेने मला संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थापक अध्यक्ष वाघमोडे सर आणी सर्व सहकार्याचे आभार मानतो.या निवडीबद्दल परशुराम सुरनर ,संदीप देवकत्ते,मलिनाथ पाटील ,महेश नाईक,दत्ता सुरनर,मनोज बिराडे, गणेश नरवटे, गोविंद पोले,आणी इतर धनंजय सुरनर यांचा मित्र परिवार आणी इतर क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदन आणी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.