दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- शहरातील गणराज गणेशोत्सव मंडळ व जय भवानी दुर्गोत्सव मंडळ तर्फे अर्पिता राजेश गिरी हिच्या प्रथम पुण्यस्मरण स्मृती पित्यर्थ दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले योगदान दिले असून बर्मा ब्लड बँक,परतवाडा येथील डॉक्टर तसेच त्यांच्या चमूचे सहकार्य लाभले.