दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी – लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- लोहा तालुक्यातील डोलारा येथील पांडूरंग शिंदे ह्या एका ऊसतोड कामगाराच्या ३ वर्षीय कार्तिक या बालकाचा गरम पाणी अंगावर पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शिरढोण ता.कंधार येथील शिवारात दि.३ फेब्रुवारी रोज शुक्रवार या दिवशी घडली. हा बालक खेळत असताना
चुलीतील लाकडावर त्याचा पाय पडल्याने भगोण्यातील उकळते पाणीत्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात विष्णुपूरी येथे दाखल करण्यात आले हेते.मात्र उपचारा दरम्यान दि.४ फेब्रुवारी रोज शनिवार ह्यादिवशी सकाळच्या सुमारास त्या बालकाचा मृत्यू झाला . डॉक्टरांनी उत्तरीय तपासनी करून बालकास त्यांच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केले. उसतोड कांमगारास बालकाच्या मृत्यूची बातमी समजताच एकच कल्लोळ झाला व सर्व कामगारांनी हळहळ व्यक्त केली. या घटनेमुळे शिंदे कुटूंबयावर दु:खाचा डोंगर कोसळला.त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, आजी – आजोबा असा त्याचा परिवार आहे.