
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादराव लोखंडे
नांदेड – उत्तर मतदार संघातील थुगांव येथील दीपक भोसले यांनी आपल्या सकार्यांकना सोबत घेऊन शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूलकर, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, नांदेड उत्तरचे आ बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांची वाढती लोकप्रियता तसेच विकास कामांचा धडाका यामुळे अनेक तरुण शिवसेनेत प्रवेश करू इच्छित आहेत. थुगांव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूलकर, संपर्कप्रमुख आनंद जाधव तसेच नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मराठवाडा समन्वयक विश्वेनाथ नेरूलकर यांनी शिवसेनेत मी नेहमीच तरुणांचं स्वागत करतो, तरुणांनी शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत राहो. तसेच नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी देखील शिवसेनेत प्रवेश करणार्याु तरुणांचे स्वागत केले आहे. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांची मतदारसंघात लोकप्रियता वाढत असल्यामुळे, अनेक तरूण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी मला यापूर्वीच माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. आ. बालाजी कल्याणकर यांनी देखील दीपक भोसले यांचे शिवसेनेत स्वागत केले असून यापुढे मतदार संघात मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद वाढणार असून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.