दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे / कोंढवा : मा. आमदार महादेव अण्णा बाबर यांचा काल वाढदिवस उत्साहात साजरा झाला. महादेव आण्णा सर्वसामान्य शिवसैनिकातून पुढे आलेले नेतृत्व. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या शिवसेनेच्या नेत्यापैकी एक म्हणून महादेव अण्णा बाबर यांच्याकडे पाहिले जाते.
कोंढवा परिसरात मुस्लीम मतदार तुलनेने निर्णायक असूनदेखील शिवसेनेचे काम गेल्या 25 वर्षापासून या भागात पोचवले आहे. पुणे महापालिकेत नगरेसवक ते महापौर म्हणून मोठे काम उभारले. कोंढवा परिसरात पाण्याचा व रस्त्यांचा प्रश्न सुरवातीपासूनच आहे. मात्र महादेव अण्णा बाबर यांच्या प्रयत्नातून या दोन्ही प्रश्नातून मार्ग काढण्यात मोठया प्रमाणात यश आले आहे.सुरवातीला अनेक वर्षे नगरसेक. त्यानंतर आमदार म्हणून त्यांची कारकिर्द झळाळली.
कार्यकर्ते जोडून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. प्रसिद्धीपासून कायम दूर राहात आपण आणि आपले काम ही महादेव आण्णा बाबर यांची कार्यशैली राहिली आहे.
सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम विचार लोक कल्याणचा हा वारसा समर्थ पुढे नेण्याचे काम महादेव अण्णा बाबर यांनी केले आहे..
त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव पै प्रसाद बाबर हे सुद्धा आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोंढवा वासियांच्या, हडपसर वासियांच्या ,वेळोवेळी कामात येतात आणि त्यांनी कोंढवा वासियांच्या वं हडपसर वासियांना कोरोना काळात हजारो लोकांना अन्नदान वं धान्य वाटप केल.
महादेव आण्णा बाबर हे पुणेकरांचें लाडके लोकनेते आहेत म्हणून त्याचा वाढदिवस दरवर्षी आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवेचा यज्ञ आयोजित करून वाढदिवस साजरा केला जातो आणि तीन दिवसांपासून सामान्यांसाठी सेवेचा यज्ञ चालू आहे आणि शासन आपल्या दारी ,आरोग्य शिबिराचे आयोजन येथे ठेवले आहे अभिष्टचिंतन सोहळा येथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या वाढदिवसाला व आरोग्य शिबिराला सुरुवात झाली.
लोक कल्याणाचा विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रामाणिक शिवसैनिक घडवले आणि अशा शिवसैनिकातील पहिला घडीतला शिवसैनिक महादेव अण्णा बाबर यांची प्रतिमा पुणे शहरात छापली गेली.
सत्ता हातात असो किंवा नसो आपल्याला समाजा करिता चांगले काम करायचे आहे हे महादेव अण्णा बाबर ची भूमिका आहे व होती.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद अण्णांना प्रत्यक्ष लाभला आहे आणि समाजात काम करत असताना माणसं जोडण्याचे काम केले. कधी ही कोणत्या गोष्टीची पर्वा केली नाही .आपल्या लाडक्या नेत्यांनी आपल्या आयुष्यात महाराष्ट्रातला पुण्यातला पहिला लोकनेता होण्याचा बहुमान मिळवला आहे.
ज्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत सर्वधर्मसमभाव जपला आहे आणि ते अभिमानाणे सांगितात की मी हिंदूंचा महादेव आहे आणि मुस्लिमांचा बाबर आहे . सर्व समाज एकत्र ठेवण्याचे काम आपल्या राजकीय वाटचालीत केले अशा लोकनेतेचा वाढदिवस सर्व जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे . आई प्रतिष्ठान च्या वतीने युवकांच्या मनावर राज्य करणाऱ्या जनतेच्या हितासाठी झटणारा आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारा युवा नेता प्रसाद बाबर यांच्या रूपाने महादेव अण्णा नी या कोंढवा वासियांच्या सेवेसाठी दिला आहे.
विधानसभेत असताना एखाद्या रिक्षा चालकांने फोन केला आणि अण्णा मी अडचणीत आहे असे संगितले व समोर मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असेल तर ते भाषण संपले की तुम्हाला लगेच कॉल करण्यात येईल व भाषण संपल्या संपल्या लगेच त्या ऑटो रिक्षावाला कॉल करून त्याचे प्रॉब्लेम सोडवले आहेत असे किती वेळा घडले आहे. अश्याप्रकारे अण्णाचं जाणसामान्यसाठी काम असतं.
अण्णा नेहमी म्हणतात सत्ता असो का नसो आपण समाजासाठी आपल्याला चांगले काम करायचे ही भूमिका आपल्याला आपल्या लाडक्या नेत्यांना महादेव आण्णानी सांगितले आहे. 2021 – 22 मध्ये वर्षभर कोरोना काळामध्ये तर कोंढवा परिसरामध्ये असा कुठलाही नेता झाला नाही की तो अहोरात्र आपल्या समाजाची जनतेची काळजी घेतो हजारो नागरिकांना मायेचा घास कोरोना काळात महादेव अण्णा बाबर ने दिला आहे.
अश्या या लाडक्या नेत्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .यज्ञाचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे आरोग्य शिबीर आहे अशा अनेक सुविधा आयोजित केले आहेत आणि पक्षाचे पलीकडे जाऊन माणसे जोडलेले आहेत त्याचे प्रतीक म्हणजे कालच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला जमलेली अलोट गर्दी यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या दिवशी सर्व समाज धावून येतो आणाच्या वाढदिवसाला .निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन हजारो नागरिकांच्या उपस्थित पार पडले.
काल आरोग्य शिबीर,शासन आपल्या दारी आले आहे,शासकीय योजना आधार कार्ड जन्म दाखला अनेक कामे एकाच छता खाली आई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केले होते.
या अभिष्टचिंतन सोहळा साठी कोंढवा, हडपसर,पुणे शहरातील उद्योगपती,पुणे शहरातील पत्रकार बांधव,शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते तसेच राजकारणातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते हजारोच्या वरती नागरिक या आरोग्य शिबीर च लाभ घेण्यासाठी व आ.महादेव अण्णा बाबर यांना शुभेच्या देण्यासाठी उपस्थित होते…तसेंच आमच्या दै चालु वार्ता वृत्तपत्राचे मुख्य संपादक डि. एस लोखंडे पाटील यांनी सुद्धा अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहून आण्णाना जन्म दिवसांच्या शुभेच्छा दिल्या.