दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-माजी समाजकल्याण मंत्री व संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ मा.बबनराव घोलप यांच्या विद्यमाने तसेच राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्रजी राजुस्कर यांच्या प्रेरणेतून जातीप्रथेविरुद्ध आवाज उठवून समता आधारित समाज निर्मितीची संकल्पना मांडणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून वंदन करण्यात आले तसेच शेकडो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.तसेच यावेळी महाराजांचे विचार ग्रामस्थांसमोर मांडून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.जातीच्या नावाखाली राजकारण न करता शिक्षण,संघटन,समाजकारण यावर लक्ष केंद्रित करावे व शिक्षक तसेच समाज कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना त्याप्रकारे बोध द्यावा असे यावेळी मार्गदर्शकांनी म्हटले.
कार्यक्रमावेळी माजी आमदार रमेश बुंदिले,प्रमुख पाहुणे विजय रायबोले,प्रमुख मार्गदर्शक दामोदरपंत हिरे,गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ.कल्याणीताई निचळ,काळगव्हाण चे सरपंच ज्ञानेश्वरराव ढवळे,सौ.मीनाताई बुंदिले,दुर्गाताई बुंदिले,उपसरपंच प्रकाश अकडते,ओंकार पडोळे गुरुजी,प्रतिष्ठित नागरिक नरेंद्र निचळ,राज्य कार्यकारिणी सदस्य शेषरावजी गव्हाळे,विठ्ठल सावळे,राजू पाटील निचळ,उमेश मंगळे शेषराव बुंदिले,गोपाल बाभुळकर,ग्रा.पं.सदस्य गोकुल पडोळे,तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती काशीरामजी बुंदिले,पंजाबराव गव्हाळे,हरिभाऊ बुंदिले,रामदासजी तायडे,गावातील राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यकारणी सुरेश बुंदिले,किशोर बुंदिले,गणेश डांगे,निलेश सावळे,सोपान वझडे,गोपाल बुंदिले,गोकुळ डांगे,सोपान बुंदीले,रमेश पानझाडे नितीन सावळे,गौरव दाणे,सोपान बैतुले,श्रीकृष्ण डांगे,गजानन वझडे,श्रीकृष्ण तायडे,प्रथमेश सावळे आदीं तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमावेळी उपस्थित होते.