
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- संघटनेमधे ही फार मोठी शक्ती आहे.चर्मकार समाजातील समाज बांधवांचे संघटन मजबूत झाले तर याचा फायदा समाजाला नक्कीच होणार आहे.चर्मकार समाज हा विखुरलेला असून सर्व समाज बांधवांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रवाहात सामील होऊन एक व्हावे.या स्पर्धेच्या युगात समाज संघटन ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत अधिकारी कर्मचारी सेलचे विदर्भ अध्यक्ष सुधाकर पानझाडे यांनी संत रोहिदास महाराज जयंती निमित्त त्रिवेणी कॉलनी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
श्री संत जगद्गुरु शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४६ व्या जयंती निमित्य आयोजीत कार्यक्रमात सर्वप्रथम संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या मुर्तीला हारार्पन करुन पूजन करण्यात आले.त्यानंतर अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांना श्रद्धांजली देण्यात आली.यावेळी समाजाकरिता योगदान देणारे समाज भूषण दलित मित्र पुरस्कार प्राप्त सुधाकर विरुळकर,त्रिवेणी मागासवर्गीय शासकीय संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक खंडारे,सामाजिक कार्यकर्ते रामदास हिरे यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वर्धा येथे पारपडलेल्या ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘भिकारी’ कवितेचे सादरीकरण केल्याबद्दल निवेदिता राजुस्कर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव वानखडे,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,रा.का.सदस्य दिनकर मालखेडे,शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन वानरे,जिल्हा सचिव विजय शेकोकार,जिल्हा उपाध्यक्ष जगदेव रेवस्कर,सुशिल वानरे,उदय गादे,सुनिल शेकोकार,विजय खंडारे,राजेंद्र शेकोकार,जगदेव रेवसकर,रामदास तायडे,सुधाकर भागवत,दिनकर मालखेडे,मानिकराव जोगे,निवेदिता बेरुलकर,सौ.मालाताई विरुळकर,कौशल्या राजुसकर आदिसह कार्यक्रमाला समाजबांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.