
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
नांदेड:-7 डिसेंबर 2021 मध्ये नेपाळमधील पोखरा येथे होणाऱ्या इंडो-नेपाळ टि-20 क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नांदेड शहरातील गुजराती हायस्कुलचा विद्यार्थी ईशान अंत बासरकर याची भारतीय “अ” संघात निवड झाली आहे. ईशान अंनत बासरकर यानी क्रिकेट खेळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळात नांदेडचे नांव कमावले मी सदैव सोबत आहे असे आश्वासन दिले तसेच ईशान व त्याचे आई-वडील व बासरकर परिवाराचा सत्कार करुन निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
ईशांन बासरकर हा इयत्ता 8 वीचा विद्यार्थी आहे. ईशांन हा क्रिकेट मध्ये लहानपणापासून आष्टपैलू खेळाडू म्हणून शालेय स्पर्धा जिल्हास्तरिय स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने त्यांना राज्यस्तरिय स्पर्धेत निवड झाली व त्यांनी राज्यस्तरिय स्पर्धेत आतिशय उत्कृष्ट खेळल्यामुळे भारतीय अ संघात निवड झाल्याबद्दल पत्र देण्यात आले. नांदेड येथील “साईसुभाष” वसंत नगर नांदेड येथे सत्कार केला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड. किशोर देशमुख, भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा जेष्ट पत्रकार प्रल्हाद पाटील उमाटे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अदित्य पाटील शिरफुले, भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय अंबुरे, पत्रकार सुनिल रामदासी, ईशानचे वडील अंनत बासरकर व बासरकर परिवार मित्र संजय कराडे यावेळी उपस्थित होते.