दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र साहुर अंतर्गत उपकेंद्र धाडी येथे स्पर्श अभियानांतर्गत जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे याबाबत असे की, आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग निवारण, गैरसमजुती व स्पर्श याबद्दल नागरिकांमध्ये असलेला समज,गैरसमज निवारण करण्यासाठी धाडी गावात उपकेंद्रांतर्गत रॅली काढून जनजागृती, स्वच्छता,
कीटकजन्य व जलजन्य आजार, आहार विहार व योगा बाबत दैनंदिन महत्त्व पटवून देण्यात येवून मार्गदर्शन करण्यात आले यात प्रमुख मार्गदर्शक साहुर प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या कर्तव्यशाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली केचे यांच्या मार्गदर्शनात समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपेश ठाकरे, आरोग्यसेवक संजय आडे,विवेक दुधे, आरोग्यसेविका रंजना साळवे, आशा कार्यकर्ती नीता चोरे, प्रज्ञा गडलिंग जनजागृती पंधरवाडा राबवत आहे