
दै चालू वार्ता
प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :– रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी आज पर्यटक सर्किट ट्रेन्स संकल्पना आधारित भारत गौरव रेल्वेगाड्या (ट्रेन्स) सुरू करण्याची घोषणा केली. या रेल्वेगाड्या भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगातील पर्यटकांना दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी साकार करण्यास मदत करतील असे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.