
प्रमोद खिरटकर
चंद्रपूर – प्रतिनिधी
मागील तेरा दिवसापासून कोरपना तालुक्यातील नारांडा फाटा येथे स्थित असलेल्या भारत दालमिया सिमेंट कारखान्यासमोर कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिपत्याखाली धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलना संबंधी शासनाकडून रीतसर परवानगी सुद्धा घेऊन स्थानिक तालुका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन निवेदन देत संबंधित सर्व मंत्री व प्रशासकीय अधिकारी यांना प्रतीलीपी पाठवण्यात आल्या मात्र आठ दिवसाचा कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारचे निराकरण न झाल्याने शेवटी कामगार वर्गाच्या माध्यमातून आमरण उपोषणाची वाच्यता करण्यात येत आहे पूर्वाश्रमीची मुरली सिमेंट कंपनी डबघाईला आल्यानंतर त्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांच्या व्यथा न्यायालयाच्या दालनात पोहोचल्या याच कालावधीत भारत दालमिया ग्रुपने कंपनी टेक ओव्हर केल्याने कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या न्यायालयाने सुद्धा कामगाराच्या बाजूनेच निर्णय देत सर्वांना आशेचा एक किरण दाखवला कंपनीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला तरी सुद्धा प्रक्लप ग्रस्त मात्र अन्यायग्रस्त राहिले अनेकांचे रोजगार गेले सतत आठ ते दहा दिवस धरणे आंदोलन चालवत सुद्धा तालुका प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून च्या हालचाली न झाल्यामुळे शिवाय पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दुल्हन मोडीत काढण्यासाठी झालेले विविध प्रयत्न कामगारांना दिल्या गेलेल्या धमक्या यामुळे सर्व कामगारांनी कुटुंबासमवेत आमरण उपोषणाची तयारी दर्शविल्याने आतातरी कंपनी व्यवस्थापनाला जाग येईल काय? न्यायालयाच्या माध्यमातून कंपनीला सुरुवात होताच या ठिकाणी पूर्वाश्रमीचे जे कामगार काम करीत होते त्यांना भर दिला जाईल त्यांचे थकित वेतन टप्प्याटप्प्याने दिले जाईल त्यांच्या जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत त्यांना रोजगार मिळेल कंपनीच्या विविध सोयी सुविधा कामगारांना लागू राहील कसा निकाल असतानासुद्धा भारत दालमिया कंपनीच्या माध्यमातून आस्थापने मध्ये काम करण्यासाठी मजुरांचे लोंढेच्या लोंढे परराज्यातून जिल्ह्यातील नारंडा या ठिकाणी येऊ लागले पूर्वी काम करत असलेला कामगार मात्र कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलनच करीत राहिला आंदोलकांच्या मागण्यावर आपली राजकीय पोळी शिकण्यासाठी जिल्हाभरातील नेत्यांनी या ठिकाणी कामगार संघ स्थापन केले व स्वताची तिजोरी भरून पसार सुद्धा झाले मात्र कामगार वाऱ्यावरच रहिला मात्र शासित या जमिनी गेल्या आत्ता पोट भरायचे कसे हा यक्षप्रश्न कामगारांत पुढे उभा टाकल्यामुळे कामगारांनी कामगार सेनेचा पाठिंबा घेत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी मनसे चे नेते सचिन भोयर, नितीन भोयर, प्रकाश बोरकर, मनसे ता.अध्यक्ष सुरेश कांमडे, भास्कर लोहबले या सह अनेक कामगार व महिला उपस्थिती होती.