
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव.२३ नोव्हेंबर. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने राज्यभरात फिरणाऱ्या भारतीय संविधान रथ यात्रा सप्ताहानिमित्त २३-११-२०२१ रोजी रथ जळगाव शहरात दाखल झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रेल्वे स्थानकाजवळ जवळील पुतळ्याचे माल्यार्पण करून रथाचे स्वागत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार श्री सुरेश भोळे (राजु मामा) व महानगराध्यक्ष श्री दीपक सूर्यवंशी यांनी केलं हा रथ २६-११-२०२१ रोजी संविधान दिनानिमित्त जळगाव शहरातील ९ मंडलात फिरणार आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेशाम चौधरी, सुभाष तात्या शौचे, महानगर चिटणीस ज्योतीताई निमभोरे, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, अनुसूचित जाती अध्यक्ष लताताई बाविस्कर, अश्फाक शेख, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, शक्ती महाजन, संजय लुल्ला, सरचिटणीस संजय गावंडे, प्रभाकर तायडे, सागर पाटील, अजय जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.