
पोलीस रक्षक की भक्षक
मोखाडा तालुक्यात जय भीम पिक्चर ची पुनरावृत्ती
दैनिक चालू वार्ता मोखाडा
प्रतिनिधी:-अनंता टोपले
दि१२/११/२०२१रोजी मोखाडा पोलिसांनी केलेल अशोभनीय कृत्य मोखाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक गणेश तारगे व मंगेश मुंडे यांनी केलेल्या कृत्याची सखोल चौकशी करा अशी आदिवासी संघटनांची मागणी आहे.
पोलिसांनी केलेल अशोभनीय कृत्य हे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघडकीस आल या घटने मधील अन्याय झालेल्या माणसांनी श्रमजीवी च्या कार्यकर्त्यांशी सम्पर्क साधून त्यांना घडलेला प्रकार सांगितला ही बाब गंभीर असून श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी यात गांभीर्याने लक्ष देत अखेर दि१५/११/२०२१रोजी पत्र देऊन दि१६/११/२०२१रोजी धरणे आंदोलन साकारले या आंदोलनाच्या रात्री सुमारे ८:३० वाजता पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे यांनी माफी मागितली व तात्काळ नगद १९५५०/- रु एवढा ऐवज त्या शेतकऱ्यांच्या स्वाधीन केला ही माफीची व्हिडीओ सध्या सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोचली परंतु एवढी मोठी चुकी करून फक्त माफी मागून प्रकरण का दाबल जातय अशी चर्चा अनेक ठिकाणी चालू आहे.
यातील पुढे जे घडल ते एकदम धक्कादायक आहे श्रमजीवी संघटनेने दि१५/११/२०२१ रोजी आंदोलनाच पत्र दिल्या नंतर हे प्रकरण उलंगट आपल्या अंगावर येऊ नये म्हणून दि१५/११/२०२१रोजी पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे यांनी स्वतः एक फिर्याद नोंदवली ह्या फिर्यादी मध्ये सगळे आदिवासी बांधव आहेत त्यातील आरोपी १)वामन अनंता गवारी,रा,धोंडमाऱ्याची मेट
२)नागेश मधुकर धोंडमारे,रा धोंडमाऱ्याची मेट
३)अविनाश कृष्णा भोये,रा सातूरली वडपाडा
४)रजनी बुधर,रा पुलाचीवाडी
फरार आरोपी
५)ओमकार बुध्दाजी झिंजुर्डे
अश्या या पाच आरोपी वरती भारतीय दंड साहित्य १८६०कलम३९५,३४१,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला दरम्यान ही फिर्याद उपनिरीक्षक गणेश तारगे यांनी स्वतः नमूद केली आहे फिर्यादीत नमूद केल्या नुसार दि१२/११/२०२१रोजी हे प्रकरण झाल होत याची पुरेपूर कल्पना पोलिसांना होती असे त्यांनी ह्या फिर्यादीत म्हटल आहे परंतु विचार करण्याची बाब अशी की ह्या घटनेची पुरेपूर कल्पना असून आणि पोलीस घटनास्थळी असून त्यांनी तातडीने गुन्हा का नोंदवला नाही याचा अर्थ या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याने हे प्रकरण असच मिटवण्याचा प्रयत्न केला असेल पण श्रमजीवी संघटना आंदोलन करेल आणि हे प्रकरण आपल्या अंगी येईल म्हणून यांनी प्रकरण उलट फिरवून या पाच आरोपी वरती गुन्हा दाखल केला असावा दरम्यान फिर्यादीत म्हटल आहे की त्यांनी २००००-/रु दमदाटी करून घेतले आहेत जर या प्रकरणात गणेश तारगे दोषी नव्हते तर त्यानी १९५५००कस्याचे दिले आणि हे प्रकरण असेच का दाबले गेले याची वरीष्ट अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भारतीय संविधानाचा व राज्य घटनेचा अपमान केला आहे यांच्या वरती तातडीने गुन्हे नोंदवून यांना नोकरी वरून काढून टाकावे अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून निवेदन देण्यासाठी बेधडक रोखठोक आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांचे आप,अमोल टोपले संघटक महाराष्ट्र राज्य,सचिन पाटील बामसेफ व आदिवासी युवा संघटक,प्रवीण मौळे पालघर जिल्हा अध्यक्ष, दीपक दांडेकर तालुका संघटक,अशोक मालक आदी,भाऊ वैजल आदी कार्यकर्ते उपस्थित होते