
दैनिक चालू वार्ता
परतूर – प्रतिनिधी नामदेव तौर
ता. परतूर येथील
महसूल विभाग अभिलेख कक्षा मार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या फेरफार नक्कल संदर्भात माहिती तसेच अपंगांना पेन्शन व राशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांति आंदोलन संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तहसिल कार्यालयातील महसूल व अभिलेख कक्ष विभागातील तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात फेरफार नक्कल संदर्भात सदरील अधिकाऱ्याकडून फेरफार नक्कल एक प्रतीचे पन्नास रुपये शुल्क वसूल करण्यात येत आहे. सदरील फेरफार नक्कलचे शुल्क किती आहे, तालुक्यातील सन २०१६ पासून २०२१ पर्यंतचे फेरफार नक्कलची शेतकऱ्यांना यादी सहित व शासन नियमांनुसार प्रती फेरफार शुल्क प्रमाणे यादी देण्यात यावी. तहसील कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाली नसल्याने टाळाटाळ केली जाते. तसेच अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचा पेन्शन प्रत्येक महिन्यात देण्यात यावा. अपंगांना त्याचे राशन कार्डचे विभक्त कुटुंब करून नवीन राशन कार्ड तात्काळ देण्यात यावे. या मागणीसाठी १५ नोव्हेंबर पासून तहसील कार्यालया समोर उपोषण करण्यात येत आहे. तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आढे, उपाध्यक्ष माऊली कदम, अशोक तणपुरे, शेरखान पठान, दादाराव बकाल,बाळासाहेब होंडबे, बजरंग वैष्णव, अंकुश बंकट ,ऋषीकेश खरात,यांच्यासह आदि उपोषणाला बसले आहेत.
फोटो — परतूर येथे तहसिल कार्यलाय समोर उपोषनास बसलेले दिव्यागंन दिसत आहे