
दै चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
आधारने लोकांच्या , मुख्यत्वे तळागाळातील लाखो लोकांच्या आयुष्यात मूलभूत बदल घडवून आणला : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
नवी दिल्ली :- केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज आधार 2 डिजिटल ओळखीच्या नव्या युगाचा आरंभ आणि स्मार्ट प्रशासन या कार्यशाळेचे उद्घाटन केले. ही कार्यशाळा 23 नोव्हेंबर 2021 पासून विज्ञान भवन नवी दिल्ली येथे सुरू होत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सोहनी, UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गर्ग तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक मान्यवरांची या कार्यशाळेला थेट उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की आधारने लाखो लोकांच्या आयुष्यात मूलभूत बदल घडवून आणला , विशेषतः तळाशी असलेल्या लोकांच्या आयुष्यात. याशिवाय सरकारी कार्यक्रम ज्या पद्धतीने राबविण्यात येत होते त्या पद्धतीत सुद्धा आधारमुळे अमुलाग्र बदल घडून आला.