
दै. चालू वार्ता प्रतिनिधी
पेठवडज बाजीराव गायकवाड
नांदेड:- आज घडीला प्रगत राष्ट्रांची कोरोना महामारीने केलेली भयावह परिस्थिती लक्षात घेता भारतासारख्या देशाला व जनतेला ती न परवडणारी आहे.
-भारतातील कोरोना संसर्गाची आकडेवारी पाहिली तर कोरोना संसर्ग अजुन पूर्णतः संपलेला नाहीच! उलट वाढतो आहे असे चित्र दिसते.
-पुढील 2-3 महीने कोरोना संसर्गाला पोषक असे वातावरण आहे. भारतातील लोकसंख्येची घनता,येथील चालीरिती, परंपरा, उत्सव प्रियता, गरिबी, अज्ञान, अंधःश्रद्धा, जनतेची रोगप्रतिबंधक लसीकरणा विषयाची कमालीची उदासिनता (भारतात अजू किमान आठरा कोटी नागरिकांनां लस देणें अवश्यक असताना) या सर्व गोष्टी कोरोना संसर्ग वाढीला अत्यंत पोषक बाबी आहेत.* *भारतामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झालेले होते. काही राज्यांनी बर्याच जिल्ह्यात कोरोना मुक्तीची घोषणा पण केलेली होती. त्यामुळे आपण अति उत्सवप्रिय पुढारी व जनता बेभानपणे लग्न सोहळे, मुंजी, शाल-अंगठी, डोहाळे जेवन, अनेक प्रासंगिक कार्यक्रम ,सभा,मोर्चेधरने,जन्मोत्सव व सनादी कार्यक्रम बिंधास्तपणे गर्दी करून साजरे करत सुटलो आहोत असेच चित्र पाहवयास मिळत आहे.!
*कोरोनाची जागतिक आकडेवारी गेल्या सव्वा महिन्यामध्ये सातत्याने वाढतच असल्याचे दिसते आहे .*15ऑक्टो-457808, 22ऑक्टो-485649,29 ऑक्टोंबर-504829,5नोव्हें-515315,12नोव्हें-594390,
19नोव्हें-659373.
*यामुळेच त्या त्या देशातील कांही शहरामध्ये जनतेचि विरोध होत असतानाही पुन्हा लाॅक डाॅऊन घोषित केलेजात आहे.
*भारतामध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, प.बंगाल आणि उत्तरप्रदेशची आकडेवारी पाहता पं.बंगाल वगळता कोरोना संसर्ग सातत्याने कमी जास्त होत असताना दिसत आहे.
*प.बंगालमध्ये-7ऑक्टो.ला
643,21 ऑक्टो.ला 833,4 नोव्हेंबरला918,व18नोव्हें.ला 860 केसेस आढळून आल्या आहेत.*यावरून देशातील कोरोना संकट पूर्णपणे टळलेले नाही हे उघडसत्य आहे.! म्हणून भारतातील व महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने अतिदक्ष राहणेच उचित राहणार आहे.
*जगात सर्व प्रथम कोरोना प्रतिबंधक लस भारतात यार झाली. जगात भारत देश हे पहिले राष्ट्र असेल की जिथे प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस विनामुल्य दिली जात आहे. पण आपण शेवटी भारतीयच आहोत नां.! लसीकरण करून घेण्यास अत्यंत उदासिन आहोत. केंद्र व राज्य शासन कोरोना महामारीची तिसरी लाट येऊ नये म्हणून टाहो फोडून जनजागृती करण्याची पराकाष्टा करत आहेत.पण आपण कोरोना संसर्गाबाबद प्रचंड मोठी किंमत देऊनही तेवढे गंभीर आहोत का? तर याचे उत्तर नाही असेच आहे.!
*मित्रांनो, या महामारीत केवढे बलाढ्य तथा नामांकित रत्नं आणि आप्त आपण गमाऊन बसलो आहोत? हे आपण थोडं आठवा.! आणि आता परत जर जिवित, आर्थिक मानसिक तथा भावनिक हानी टाळावयाची असेल तर आपणास “पाचसुत्री कार्यक्रमाची” अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.नव्हे ते क्रम प्राप्तच आहे.!
*1.प्रथम सर्वांनीच कुटूंबात शंभरटक्के कोरोना रोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्याच.*
*2. प्रत्येकानी मास्क वापराच.*
*3.सॅनिटायझरचा वापर सदोदित कराच.*
*4. सामाजिक अंतराचे पथ्य राखाच.*
*5. शासनानी व प्रशासनानी घालून दिलेले सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळाच.*
*व त्यांना सहकार्य करा.**एवढे तर कराच पण त्याबरोबरच हेही कराःः*
*माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे आता आचरणात आणा. घाबरू नका.गोंधळुन जाऊ नका. सतर्क रहा. सजग रहा.आफवावर विश्वास ठेऊ नका. सकारात्मकतेने जीवन जगा.इतरांनाही धैर्य द्या. एकमेकाला बरोबर घेऊन चला.एक दुसर्याला सहकार्य करा. स्वतः होऊन निर्भिडपणे त्वरित वैद्यकीय तपासणी करून वेळीच उपचार करून घेण्यास तत्पर रहा.! अशक्त,जुनाट आजाराने पीडित (मधुमेही, उच्च रक्तदाबाने पिडित, कर्करोग, एड्स इ.आजारानी पिडित असाल तथा स्टेराॅइडस् घेत असाल तर),गरोदर महिला व साठ वर्षावरिल ज्येष्ठ नागरिक इ.नी तर अधिकच दक्ष राहून घरीच राहने उत्तम.गर्दी करू नका,गर्दीत जाऊ नका.कुटूंबातच रहा, आनंदी रहा.!*
*जर आपण एवढे केले तर भारतात येऊ पाहणारी संभाव्य तिसरी लाट तथा पुन्हा लॉकडाऊनची वेळ आपणास सहज टाळता येईल असे डॉ.हंसराज वैद्य यांनी सर्व जनतेला कळकळीचे आवाहान केले आहे.*
*शासनास नम्र विनंतीवजा निवेदनःः
*ईतिहासाची पुनरावृती व कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाने किमान कोरोना प्रतिबंधक लसीचे एक नव्हे “दोन खुराक”,मास्क, सॅनेटाझर आणि सामाजिक अंतर या गोष्टींचे कडक निर्बंध टाकावेत व निर्बंध न पाळणार्याची कसलीच गय न करता पाणी,लाईट,रेशन तथा सर्व सुख सुविधा त्वरित बंद कराव्यात आणि कार्यालयात ,सार्वजनिक ठिकानी,प्रवेश बंद करावा(प्रवेशावर बंदी आनावी) .*