दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, सहायक अभियंता निकिता कटकमवार, वंदना माने, राजश्री वरवडे यांच्या उपस्थितीत बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
भूम :-शहरातील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये पहिला बाल आनंद मेळावा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी आनंद घेतला.
आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत चविष्ट,चटकदार व रुचकर खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी व उपस्थित पालक व नागरिकांनी घेतला.या वेळी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या हस्ते व सहायक अभियंता निकिता कटकमवार, वंदना माने व राजश्री वरवडे यांच्या उपस्थितीत बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मान्यवरांचे स्वागत शाळेच्या वतिने करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावर्षी पहिल्याच आनंद मेळाव्याचे आयोजनास मोठा प्रतिसाद मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. बाल मेळाव्यात तब्बल चाळीस हजाराहून अधिक रुपयाची उलाढाल झाली. हा आनंद मेळा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका मेघा सुपेकर, कल्याणी असलकर, सरस्वती कुलकर्णी आदिनी परिश्रम केले.