
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी प्रवीण रणबागुल यांची फेरनिवड करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रेखाताई ठाकूर यांनी निवडीची घोषणा केली.या निवडीमुळे भूम परंडा वाशी विधानसभेतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भूम येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहराध्यक्ष रोहित गायकवाड,अक्की गायकवाड ,वैभव गायकवाड ,महावीर बनसोडे ,शिवाजी पायाळ ,मुकुंद लगाडे, सिद्धोधन सरवदे, दत्ता शिंदे ,जानराव तालुक्यासह जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.