दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
चिंचपूर ढगेच्या शिवजयंती महोत्सव समितीचा आदर्श इतरांनी घ्यावा.
भूम :- मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे मात्र केवळ गुणवंत होऊन चालणार नाही तर मुलगा हा संस्कारक्षम असला पाहिजे असे प्रतिपादन भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी चिंचपूर ढगे येथील शिवजयंती महोत्सव कार्यक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर भूम तहसीलचे नायब तहसीलदार अभिजीत जगताप, ह.भ.प.नरेंद्रगिरी महाराज,सरपंच मधुकर सांगळे,उपसरपंच सुधीर ढगे,माजी पोलीस पाटील श्रीराम ढगे पाटील, अशोक ढगे,अशोक सांगळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना साळवे म्हणाले की,गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे ते घेतलंच पाहिजे मात्र त्यासोबतच त्याला जोड संस्काराची दिली तरच खऱ्या अर्थाने जीवन सुखी होईल. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक प्रतिष्ठान कार्यक्रम आयोजित करतात मात्र चिंचपूर येथील शिवजयंती महोत्सव हा गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा गौरव करून खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांची जपणूक करत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नायब तसीलदार अभिजीत जगताप यांनीही जयंतीच्या निमित्ताने विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेतल्याबद्दल शिवजयंती महोत्सव समितीचे अभिनंदन केले व गावातील पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांना शुभेच्छा देखील दिल्या.
याप्रसंगी मोहम्मद शेख,दत्तात्रय विधाते, तेजस्विनी करळे, पूजा आडमुटे,ओंकार सांगळे,कृषिकन्या करळे,प्रियंका ढगे यांनी आपले मनोगत व्यक्त करत गावासाठी पुढील काळात शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रकांत तांबे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सतीश मातने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती महोत्सव समितीच्या सर्व सदस्य व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी गावात विविध क्षेत्रात चमक दाखवणाऱ्या 17 चिंचपूरकरांचा सन्मान शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आला. यामध्ये महादेव कवाळे,मोहम्मद शेख, दत्तात्रय विधाते,ॲड.पंडित ढगे,विकास कसबे,घनश्याम येडे, विनोद ढगे, तेजस्विनी करळे,पूजा आडमुटे,ओंकार सांगळे, कृषीकन्या करळे, डॉ.सुरज विधाते, प्रियंका ढगे,प्रांजली डोंबाळे,शुभांगी काळे व निशा अगावणे यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल व मिळवलेल्या यशाबद्दल सन्मान करण्यात आला.