दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नाशिक : भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी विधानसभा निवडणुकांपूर्वी अनिल देशमुख यांनी विनवण्या केल्या होत्या, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता.१३) केला.
त्यावेळी त्यांना तिकीट दिले नाही.
सुदैवाने ते निवडून आले, व गृहमंत्रिपदही मिळाले. परंतु सरकारमध्ये असताना हप्ते बांधल्याने त्यांना जेलवारी करावी लागली. आता जामिनावर बाहेर आलेले असून, त्यांनी आपली कायदेशीर लढाई लढावी, असा सल्ला श्री.महाजन यांनी दिला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर माध्यमांशी संवाद साधताना श्री. महाजन यांनी टीका केली. निवडणुका घेण्याचे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून, यावर मत विचारले असता ते म्हणाले, की निवडणुकांना आता वर्षभर राहिला आहे.
तुम्ही सत्तेतून पायउतार झाले म्हणजे लगेच निवडणूक घ्यायच्या असे नसते. घोडामैदान दूर नसून, निवडणुकांमध्ये बघूया, असे प्रतिआव्हान श्री.महाजन यांनी दिले.