दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील मानूर येथे जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील इयत्ता चौथी वर्गात शिकणाऱ्या सहा सात मुलीशी अधील चाळे करणे, त्यांना वारवार मोबाईल मधील पाणेरड्या चित्रफीत दाखवणे, मुलीच्या अंगाला हात लावणे असा प्रकार केल्याने शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकांविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
देगलूर
तालुक्यातील मानूर येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत खुतमापूर येथील गोविंद ज्ञानोबा पाटील (५२) हा शिक्षक चौथ्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी सतत अश्रील चाळे करायचा, मुलीना मोबाइलमधील चित्रफीत दाखवणे व त्याचबरोबर नको त्या ठिकाणी मुलीच्या अंगाला स्पर्श करायचा मात्र भितीने अनेक मुलींनी आपल्या पालकांना सांगण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या शिक्षकाचे मनोधैर्य यात गेले. अखेर पालकांना या बाबीची कुणकुण लागल्याने त्यांनी शाळेत धाव घेतली, मात्र तो शिक्षक शाळेत गैरहजर होता. पालकांनी प्रभारी मुख्याध्यापक अरुण शिंदे यांना त्या शिक्षकास दि. १५ फेब्रुवारी बुधवारपर्यंत बोलावून घ्या असे सांगितले. मात्र तो शिक्षक शाळेत हजर झाला नाही. संतप्त झालेल्या पालकांनी शेकडो नागरिकांना सोबत घेऊन दि. १६ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता शाळेला कुलूप लावण्यासाठी गेले असता घटनास्थल पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे हजर झाले.
त्यांनी पालकांना मरखेल पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात राजकीय मंडळीकडून शिक्षकी पेशाला काळिमा फासलेल्या गोविंद पाटील या शिक्षकावर गुन्हा दाखल होवू नये म्हणून पडद्याआड अनेक हालचाली केल्या, मात्र पालक व मानूर येथील ग्रामस्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईपर्यंत जाणार नसल्याची ठोस भूमिका घेतली. त्यामुळे मरखेल पोलीसांना शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा मरखेल पोलीस ठाण्यात सुरू होती. पालकांनी काही दिवसापूर्वी याबाबतची लेखी तक्रार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करूनही अधिकाऱ्याकडून
कसलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मुलींचे पालक संतप्त झाले होते. दरम्यान या प्रकरणी दरम्यान मरखेल पोलिस ठाण्यात दिल महिला पोलीस अधिकारी नसल्याने परिक्षांच्या आदेशानुसार बिलोली येथून रामपल्ले या महिला पोलीस अधिकारी आल्यानंतर गोविंद पाटील या शिक्षकाविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी दैनिक चालू वार्ता प्रतिनिधीशी सांगितले.