
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- मातंग समाज विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या २१ व्या वर्धापन दिना निमित्त दि.१८/०२/२०२३ रोजी औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिर या नाट्य ग्रहा मधे मातंग समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री उत्तमराव कांबळे व संयोजन समितीचे अध्यक्ष श्री प्रमोद कांबळे यांनी विविध संघटने मधे राहून किंवा व्यक्तीगत समाजहितोपयोगी कार्य करणार्या एकूण १४ सत्कारमुर्तीचा फेटा बांधुन शाल श्रीफळ तसेच क्रांतीगुरू लहुजी साळवे तसेच लोक शाहिर आण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्र आसणारे सन्मान चिन्ह (पदक)देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसंगी प्रा.श्री संजय गायकवाड साहेब यांच्या हस्ते जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हाळनोर सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर श्री शिवाजी त्रिंबके यांना सन्मान चिन्ह देऊन प्रा.श्री संजय सांबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याच्या सत्कार प्रसंगी जय संघर्ष संस्था/संघटनेचे श्री संतोष काळवणे,सोमनाथ गायकवाड,रमेश कोलते,अब्बास खान,विशाल आवसरमल,राजू खिल्लारे,लक्ष्मण आण्णा सोनवणे,विशाल नांदरकर,अमोल तावरे,अश्पाक शेख,सुनिल आप्पा लिंगायत,संजय नलावडे,जयसिंग बेळगे,ज्ञानेश्वर हाळनोर,गणेश शेळके,संघर्ष संघटनेचे पत्रकार श्री रविंद्र सुरडकर,सौ.यमुनाबाई संजय हाळनोर,सौ.रंजना शिवाजी त्रंबके तसेच सौ.निशा गणेश शेळके उपस्थीत होत्या.