
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथील कद्रेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलेल्या मरखेल येथील चोवीस वर्षे तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरच्या चुकीच्या निदनामुळे झाला असा मनात राग धरून संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. सदरील घटना शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी चार वाजता घडली. या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी अटक केली असुन त्याना न्यालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील मरखेल येथील कलीम खदीर अत्तार ( २४ ) या तरुणास उलट्या व डोकं दुखत असल्यामुळे उपचारासाठी येतील कद्रेकर हॉस्पिटल मध्ये शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. अडमीट केले असता उत्तरादरम्यान
साडेतीनच्या सुमारास त्या तरुणाचा मृत्यू झाला. सदरी तरुणाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या चुकीच्या निदनामुळे झाला असा आरोप करीत त्या मयत मुलाच्या नातेवाईकांनी दवाखान्यातील काही उपकरणाची तोडफोड केली. दरम्यान घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संगम परगेवार हेघटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सदरील घटनेची माहिती शहरातील डॉक्टर मंडळींना समजतात डॉक्टरच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाणे गाठले त्यांनंतर दवाखान्यातील बारा लाख ५० हजार रुपयांचे उपकरणाची नुकसान व दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची तक्रर डॉक्टर मयूर प्रकाश कद्रेकर यांनी दिली. डॉक्टरांच्या फियार्दीवरून मयत तरुणाचे दोन भाऊ व दोन मामा व अन्य इतरा विरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती वैद्यकीय सेवा संस्था ( हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान ) यांना प्रतिबंधक अधिनियम २०१० नुसार कलम ४ ६ व भादविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यालयाने दोन दीवसाची पोलीस कोठ- डी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे करीत आहेत. या घटनेमुळे देगलूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून नातेवाईकांना शांत केले.