दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांर्गत समाविष्ट असलेल्या केळापूर येथील भोई समाज अध्यक्ष तथा ग्रामीण युवा नेते प्रदिप भनारकर यांनी तालुक्यातील सायखेडा जलाशय हा भोई समाजातील बेरोजगारांना आपली उपजीविका व रोजगार मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करुन मिळवून दिल्या बद्दल राळेगांव चे आमदार प्रा.अशोक उईके, केळापुर पंचायत समिती चे बि.डी.ओ. विठ्ठल जाधव आणि या मागणीसाठी वेळोवेळी सहकार्य करणारे परिसरातील लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर , यांचा समाजाच्या वतीने रमेश शिवरकर ,प्रदिप भनारकर यांनी शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देवून सत्कार केला. भोई समाजाचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय असल्याने उपजिवीका व रोजगारा साठी सायखेडा जलाशय भोई समाजा मिळण्याची मागणी पुर्ण झाल्याबद्दल युवा जिल्हा अध्यक्ष प्रदीप भनारकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. रूंझा सर्वोदय मत्स्यव्यवसाय संस्था अध्यक्ष देवानंद करलुके, नितेश मांढरे,शंकर करलुके ,अनिल भनारकर, सतीश करलुके यांनीही या बाबत सतत प्रयत्नशील राहुन मागणी पदरात पाडून घेतली आहे.