दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:खानापूर ते मुखेड राज्यमार्ग 161 मंचिल खानापूर ते खानापूर फाटा पर्यंत रौड़ चे काम अर्धवट केल्यामुळे वाहतूकीस तसेच नागरीकांना अतानांत त्रास होत आहे. तसेच ग्रामिण आरोग्य केंद्र मेन रोडवर आहे. रोडचे धुळ दवाखान्यात जाऊन गरोदर स्त्री, इतर रुग्णांना दमा, खोकलाचा आजार होत आहे. तरी मा. साहेबांना विनंती की, मौजे खानापूर ते मुखेड राज्यमार्ग 161 मधिल खानापूर ते
खानापूर फाटा पर्यंत रोड चे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे ही नम्र विनंती. वरील मागणी तात्काळ मान्य करुन खानापूर फाटा ते खानापूर पर्यंतचे रोडचे काम करण्यास विलंब अथवा टाळाटाळ झाल्यास मनसे च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले