
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- शिरशी(बु.) येथील मंजूर नवीन नळ योजनेचे पाण्याच्या टाकीचे बांधकाम शिरशी (बु.) येथील १९८६ झालेल्या वस्ती मध्ये केल्यास पुर्णवसनची मोठया प्रमानात असनारी समस्या सुटेल गावातही पाणी नेण्यास सोईचे होईल.१९८६ साली बसलेल्या पुनर्वसन मधिल रहीवास्यांना पाण्याच्या व लाईटच्या अपु-या पुरवठयामुळे वस्तीतील लोकांचे जास्त प्रमानात स्थलांतर होत असून स्थलांतरासाठी पर्याय नसलेल्या कुटूंबाना दोन किलो मीटर अंतरावरुन डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.नागरीकांना होणा-या वरील त्रासा पासून मुक्त करण्यासाठी नवीन होणाऱ्या नळ योजनेच्या टाकीचे बांधकाम गावापासुन उंचावर असलेल्या पुनर्वसन मध्येच करावे.त्यामुळे गावासह पुनर्वसन मध्येही पाणी पुरवठा मुबलक व सोयीने होईल परिणामी वस्तीचे होणारे स्थलांतर थांबेल.अशी मागणी प्रा.साहेबराव बेळे,व्यंकटी जाधव,बळी गंगोत्री, दत्ता गंगोत्री, गोविंद गंगोत्री,लोकडोबा गायकवाड इ.नी जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे केली