
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी.
देगलूर तालुक्यातील मौजे सुंडगी येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका सौ . गवते मॅडम, यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिंधू महाविद्यालय देगलूर येथील प्रा. भीमराव दिपके यांनी लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोककल्याणाची होते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी, सर्व समाजातल्या रंजल्या गांजलेल्या लोकांना एकत्र करून, खऱ्या स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रियावर अन्याय झालेला नाही, शिवाजी महाराजांच्या त्यांच्या कार्यातून खरा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे तरच आपला विकास होईल असे प्रतिपादन केले. यावेळी संजय मारोराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुंडगी, माजी सरपंच लालू हरिबा कांबळे, गंगाधर सुंडगीकर , श्री नाईक सर, सुनील कांबळे, राजू कांबळे संग्राम सुंभाळे, ग्रामपंचायत सेवक, मारोती सुंबाळे, शालेय विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते