
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / कलंबर ( बु. ) :- तर्कशुद्ध बुद्धीने विचार करण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे संस्कार.
संस्कार क्षम मन ही देणगी आहे. हे साठवीत आसते यातुन विद्यार्थी घडत असतो असे विद्यार्थी घडवण्याचे कार्य अस्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून हे संस्कार इंग्लिश स्कूल हे विद्यालय करीत आहे. आसे गौरवउग्द्गार
स्वामी विवेकानंद सेवा भावी संस्था कलंबर (बु.) ता. लोहा जि. नांदेड संचलीत- संस्कार प्रति प्रायमरी इंग्लिश स्कूल व सृजन कोचिंग क्लासेस च्या स्नेहसंमेलना चे उद्घाटक म्हणुन बोलताना समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथील पर्यवेक्षक तथा कलाध्यापक राजीव अंबेकर यांनी काढले.या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी पं. सं. लोहा चे मा. सभापती बाबुअप्पा- मुक्कनवार प्रमुख पाहुणे- म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा चे सीनेट सदस्य मा.दिपक मोरताळे तर उद्घघाटक- समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया पर्यवेक्षक – राजीव अंबेकर होते.प्रमुख अतिथी म्हणून अनुलोमचे लातुर जिल्हा प्रमुख-डॉ अजित मुळजे, लाठ (खु.) सरपंच-विठ्ठलराव कौठकर, कलंबर(बु.) तंटामुक्ती अध्यक्ष श्री बळी पाटील भोकरे सरपंच प्रतिनिधी – शिवपाल ठाकुर, उपसरपंच गुंडेवाडी – संभाजी गुंडे, व्हाईस चेअरमन पांडुरंग शिरगीरे, आलेगाव चे उपसरपंच प्रकाश मोरे,आदी सर्व उपस्थिताचे सत्कार संस्थेचे सचिव-गंगाधर (बापु) मैलारे यांनी केले
या वेळी विष्णूपंत जोशी, विठ्ठल गुंडे,बाबुराव बीजे या पंचकऋशीतील प्रतीकूल परीस्थिती तुन उच्च पदी आपले पाल्य बसवेना-या तीन पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा परीक्षेत प्राविण्य प्राप्त आजी माजी विद्यार्थ्यांचा भेट वस्तू प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सावली मुक्कनवार हीने गायलेल्या श्री गणेशा च्या स्तवनाने कार्यक्रमा ची सुरवात झाली वय वर्षे तीन ते चवदा वर्षे आसना-या बालकलावंतानी आपले वेग वेगळे नृत्य विष्कार सादर केले. श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यास पंचकऋशीतील पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता संगेवार, संजय मुक्कनवार सौ. सुप्रिया शिंदे, सौ. सुमित्रा आनंतवार, कु. वैष्णवी तुप्पेकर, सौ. भाग्यश्री संगेवार सौ.सुलोचना घुमे, माधव आवाळे, बाळु मोरे, , शाम नागठाणे, सागर ठाकुर, यांनी परीश्रम घेतले. तीन तास चालल्या कार्यक्रमा चे प्रास्ताविक संचालक- प्रा. बालाजी संगेवार यांनी मांडले सुत्रसंचलन सौ.पायल संगेवार तर आभार शाळेच्या मु. अ. सौ. सुवर्णा मुक्कनवार यांनी मांडले.