दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर तालुक्यातील खानापूर ते मुखेड राज्यमार्ग 161चे काम खूप दिवसापासून बंद असल्यामुळे खानापूर ते खानापूर फाटा पर्यंत रौड़ चे काम अर्धवट केल्यामुळे वाहतूकीस तसेच नागरीकांना अतानांत त्रास होत आहे. तसेच ग्रामिण आरोग्य केंद्र मेन रोडवर आहे. रोडचे धुळ दवाखान्यात जाऊन गरोदर स्त्री, इतर रुग्णांना दमा, खोकलाचा आजार होत आहे. तरी खानापूर ते मुखेड राज्यमार्ग 161 मधिल खानापूर ते
खानापूर फाटा पर्यंत रोड चे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले वरील मागणी तात्काळ मान्य करुन खानापूर फाटा ते खानापूर पर्यंतचे रोडचे काम करण्यास विलंब अथवा टाळाटाळ झाल्यास मनसे च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष आनंद उत्तमराव कामशेट्ट
गजानन वरसमवार
मनसे जिल्हा उपाध्यक्ष नांदेड
मन्मथ परबते मनसे कार्यकर्ता
चंदू अक्यमवार मनसे देगलूर-बिलाली विधानसभा अध्यक्ष
आधी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.