दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:-तालुक्यातील वांगी (खू) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.तुतारी, हलगी, भगवे झेंडे घेऊन पारंपरिक वेश धारण करून राजमुद्रा प्रतिष्ठान पदाधिकारी यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन,भव्य मिरवणूक काढण्यात आली. वर्ष ११वे असून शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले, तसेच विनोद रोकडे महाराज यांचे कीर्तन झाले. सोमवारी २० रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी ७ वा. शिवभोजन आयोजन करण्यात आले.संध्याकाळी ९ वा सम्राट संतोष महाराज पुजारी सातारकर यांचे भारुडाचे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष काका सुके, उपाध्यक्ष जालिंदर गुंजाळ ,खजिनदार रामेश्वर ढगे, राजमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिवभक्त, समस्त गावकरी असंख्य उपस्थित होते.