दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती,नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,आमचे मार्गदर्शक आदरणीय इरवंतराव पाटील नरंगलकर साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.
स्व इरवंतराव पाटील नरंगलकर व स्व.संभाजीराव मंडगीकर (मा.अध्यक्ष जि.प.नांदेड) 1979 साली दोघेही पंचायत समितीवर अपक्ष निवडून आले होते अपक्ष असताना हि दोघांनी सलग 11 वर्षे पंचायत समिती सभापती व उपसभापतीपद भुषविले होते. आपल्या 18 वर्षाच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात पाटील साहेबांनी ग्रामीण भागात जास्तीत जास्त रस्ते कसे पोहचले जातील या वर भर दिला होता.देगलूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील समस्यांची त्यांना जाण होती त्यामुळे “विकास कामाचा एनसायक्लोपिडीया” असा गौरवाने उल्लेख केला जायचा.ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी या साठी विरभद्र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आलूर,नरंगल,शेवाळा येथे शाळा, महाविद्यालाची, वाचनालयाची स्थापना त्यांनी केली होती. नरंगल सेवा सहकार सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. साहेबांच्या जाण्याने फार मोठे नुकसान झाले असून पोकळी कधीच भरून न निघणारी नाही असे सर्व देगलूर व देगलूर तालुक्यातील नागरिकांमध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झाले आहे