दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
शिवजयंती निमित्त गाईड संघटनेतून अनोखा उपक्रम सुरू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे किल्ले पन्हाळगड .पर्यटक व गड प्रेमी मोठ्या संख्येने पन्हाळगडाला भेट देत असतात. गडावरील ऐतिहासिक थरारक प्रसंग व संपूर्ण गड विषयी ची माहिती गड पाहण्यासाठी येणारे पर्यटक यांना पन्हाळा गाईड संघटनेचे सदस्य माहिती देत असतात.या शिवजयंती पासून संघटनेने नवीन उपक्रम सुरू केला. असून प्रत्येक येणाऱ्या पर्यटकांना शिवजयंतीला गाईड संघटनेमार्फत प्रत्येक सदस्यांनी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करून मोफत पन्हाळा दर्शन गाईड केले जाणार आहे.या संघटनेत एकूण ५० सदस्य असून या शिवजयंतीला जवळपास ४५ ते ६० पर्यटका च्या कुटुंबांना मोफत पन्हाळा गडाची माहिती सांगण्यात आली. या नवीन उपक्रमामुळे पर्यटकांकडून व स्थानिकांकडून या गाईड संघटनेचे कौतुक करण्यात आले. व असेच उपक्रम राबवले अशी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी काही लोकांना सुचवले आहे यावेळी
गाईड संघटनेचे.अध्यक्ष राहुल भोसले. उपाध्यक्ष राजू मुल्ला सचिव अरूण भनगे ,सदस्य अर्जुन कासे ,वैभव कारंडे अजित पवार ,संजय कांबळे वैभव कोळी ,धनंजय कांबळे, गजानन कोळी , रियाज मुजावर, राकेश उदाळे ,मदन काशीद ,विजय भोसले ,हर्षद पन्हाळकर, राजू बांदिवडेकर ,प्रवीण शिंदे ,सुरज कासे, मुबारक मुजावर, नासिर मतवली. कैलास कारंडे, आदी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते