
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- लातूरचे लोकप्रिय खासदार मा सुधाकरराव शृंगारे साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरणे करण्यात आली त्यामध्ये प्रथम येणाऱ्या अय्याजभाई 11 संघास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख व भव्य चषक आणि द्वितीय येणाऱ्या के जी एन संघास पंचावण हजार पाचशे पंचावण रुपये रोख व भव्य चषक आणि तृतीय येणाऱ्या डी ब्रदर्स संघास तेहत्तीस हजार तीनशे तेहत्तीस रुपये रोख व भव्य चषक असे सर्व बक्षीशे सन्माननीय खासदार सुधाकरजी शृंगारे साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकीय क्षेत्र असो किंवा मनोरंजन, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रास माननीय खासदार साहेबांनी भरभरून मदत केली आहे. ACL संयोजक समिती अहमदपूर तर्फे साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आलेलातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खा.मा. सुधाकरराव शृंगारे साहेब माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब माजी आ.बब्रुवानजी खंदारे साहेब माजी सभापती भारत भाऊ चामे दलित चळवळीचे नेते समाज भूषण संजय भाऊ कांबळे धनंजय जोशी अहमदपूर नगरपालिकेचे नगरसेवक अमित भैय्या रेड्डी ,राहुल शिवपुजे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देवकते समता कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद शिंदे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास इत्यादी मान्यवर उपस्थित होते खासदार चषक यशस्वी करण्यासाठी खासदार चषक यशस्वी करण्यासाठीची संयोजन समिती अध्यक्ष महादेव बनसोडे,सचिव सचिन भाऊ वाघमारे,बजरंग गायकवाड,किरण वाघमारे,गौतम बनसोडे,रवी लामतुरे, बालाजी ढवळे,बालाजी कदम,श्रीकांत जंगले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह्या सर्वांची उपस्थिती होती