दैनिक चालू वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड /परळी — जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद बीड यशवंतराव चव्हाण सेंटर महात्मा गांधी सेवा संघ व जिल्हा पुनर्वसन केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव साहित्य साधनांसाठी नोंदणी व तपासणी शिबिराचे आयोजन आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे करण्यात आले
प्रारंभी शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माननीय धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर अनिल गुट्टे, डॉक्टर व्यंकटेश तिडके ,महात्मा गांधी सेवा संघाचे ऋषी सलगर शेख निजामभाई परिचारिका मनीषा महाडकर, स्वाती जगतकर ,शेख फिरोज भाई, विठ्ठल साखरे, मानव विकास मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ए के चव्हाण अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक आर पी लोढा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उद्घाटक डॉक्टर संतोष मुंडे यांनी दिव्यांग बांधवांना सर्व साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील असे आवर्जून नमूद केले.
प्रमुख अतिथी अधीक्षक डॉक्टर अनिल गुट्टे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांगाना तपासणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल व सदरील शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राधान्याने सहकार्य केले जाईल असे प्रमुखांनी नमूद केले .शिबीरात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप करून व इतर साधन साहित्याचे नोंदणी करण्यात आली. शिबिरात परळी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून साहित्य साठी नाव नोंदणी केली परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरावर दिव्यांग व्यक्तींना अवयवांचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर आर शिंदे वै सा का अंकुश नखाते जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे विजय काणेकर सतीश निर्मळ यांच्या मार्गदर्शकाखाली नोंदणी शिबिर संपन्न झाले शिबिरात जवळजवळ 245 दिव्यांग बांधव उपस्थित होते त्यात कर्णबधिर मूकबधिर अस्थिव्यंग व अंध या प्रवर्गातील दिव्यांग बांधव उपस्थित होते
नाव नोंदणी केलेल्या दिव्यांगांना एलबो क्रॅचेस, व्हीलचेअर, श्रवण यंत्र ,अंधा साठी काठी व चष्मा यासारख्या साधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे शिबिरात कृत्रिम अवयव मोजमाप तज्ञ ऋषी सलगर ,शेख निजामभाई यांनी संबंधित दिव्यांगांना माप घेऊन साहित्य विषयी मार्गदर्शन केले शिबिर यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर बडे व्ही एस पंडित राजेंद्र कसबे शेख अबेद श्रीकांत जोशी ज्ञानसागर निवासी कर्णाबधीर विद्यालयाचे मिलिंद शिंदे संदीप इप्पर आदींनी परिश्रम घेतले