
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले आहे
शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली होती. त्यांच्या या मागणीला चक्क भारतीय जनता पक्षातून पाठिंबा मिळाला आहे. भाजपच्या मोठ्या नेत्याने ठाकरे यांच्या मागणीचे समर्थन करत ट्विट केलेय. त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केलीय.
काय होती उद्धव ठाकरे यांची मागणी
आपले पक्ष व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यांकडून सातत्याने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे. आता सोमवारी ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे म्हणाले,की निवडणूक आयोगाने एवढे शपथपत्र, प्रतिज्ञापत्र मागितले. एवढे गठ्ठे दिले. पण त्यानंतर आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही.
मग एवढा खर्च कशाला का करायला लावला.आता निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नाही. शिवधनुष्य रावणाला पेललं नाही. ते मिंध्यांना काय कळणार आहे. चिन्हं दिलं तर शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे.