
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतीनिधी -दीपक कटकोजवार
ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना मथुरा लोकसभेच्या खासदार हेमा मालिनी यांनी दि.२१फेब्रुवारी २०२३ ला मुंबई येथे महाराष्ट्राचे वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यगीत गाणारा बोलका ध्वज देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच *”एक भारत श्रेष्ठ भारत” या संकल्पनेअंतर्गत करावयाच्या कार्यक्रमासंदर्भात या भेटी दरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचे वृत आहे* मुंबईत एनसीपीए येथे आगामी 19 मार्च रोजी सायं. 7 वा. हा कार्यक्रम प्रस्तावित केला असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.