
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
अभिनव उपक्रम” नाचून नाही तर, वाचून शिवजयंती साजरी..”
भुम:- तालुक्यातील ईट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९3 व्या जयंतीनिमित्त प्रथमच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ईट आयोजित परिवर्तनवादी शिवजयंती साजरी करण्यात आली.
सध्याच्या डिजिटल काळामध्ये आईचे मुलं गेम्स, मोबाईल च्या आहारी गेलेलं आपल्याला दिसंत असतात आणि ह्यांना आपल्यासाठी अनेक महामानवांनी स्वतःच्या जिवाजी पर्वा केली नाहीय. आणि ह्याचा महामानवांचा इतिहास आजच्या नवयुवकाना समजवण्याचा प्रयत्न आम्ही शिवजयंती निमित्त कॉम्रेड अशोक माने यांच्यातर्फे, कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ” शिवाजी कोण होता ? ” हे अत्यंत आणि स्वप्या भाषेतील २०० शिवचरित्र शिवजयंती निमित्त वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता जेणे करून आजच्या तरुणांपर्यंत शिवराय पोहचले पाहिजेत.छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून कॉ. अशोक माने यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्यांनंतर ईट शहरातील जेथे जेथे शिवजयंती साजरा करत आहेत तेथील मंडळांना भेट घेऊन त्यांना शिवचरित्र देऊन शिवजयंतीच्या सदिच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने गावांमध्ये शोभायात्रा काढून विद्यार्थ्यांचा कलागुण सादर केला यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता हे शिवचरित्र भेट देण्यात आले समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब देशमुख ,जि प प्रशाला चे मुख्याध्यापक पांडुरंग सर कवडे, सहदेव हुंबे सर, लक्ष्मीकांत चव्हाण सर, पत्रकार बंधू सोमेश्वर स्वामी पत्रकार फैसल भैया काझी,फकीरा दलाचे अध्यक्ष बाबासाहेब थोरात AISF जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने, मा अध्यक्ष बाळासाहेब हुंबे, मा.कोषाध्यक्ष सुरज वेदपाठक, सचिव मयूर पवार, समाधान खवळे, सुरेश टिळेकर, नाना थोरात, अक्षय काळखैर तसच गावातली नागरिक व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.