
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनीधी -संभाजी पुरीगोसावी सातारा : कर्नाटकहून पुण्याकडे निघालेल्या कंटेनरवर कारवाई करीत जवळपास तळबीड पोलिसांनी ८४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कंटेनरसह असा एकूण १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तळबीड पोलिसांना यश आले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन कर्नाटकहून पुण्याकडे प्रतिबंधक गुटखा वाहतूक करणारा कंटेनर जाणार असल्याचीही माहिती तळबीड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तळबीड पोलिसांनी नाकाबंदी करुन ही मोठी कारवाई केली. याप्रकरणी महम्मद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले आणि मेहबूब बाबुमिया (बिदर कर्नाटक) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विनापरवाना व बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणारा हा कंटेनर चालक आणि किन्नर दोघे टोलनाका चुकवून पुण्याकडे जाणार होता. मात्र तळबीड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पहाटेच्या सुमारांस हा कंटेनर यशवंतनगर गावच्या हद्दीत सह्याद्री कारखाना परिसरांत येताच पोलिसांनी कंटेनर थांबून चालक व किन्नरकडे अधिक चौकशी केली असता. दोघांनीही पोलिसांना उडवा उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांना चांगलाच संशय येऊ लागला. अखेर पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता कंटेनर मध्ये प्रतिबंधक गुटखा आढळून आल्यांने कंटेनरसह चालक आणि किन्नरला पोलिसांनी ताब्यांत घेवुन तळबीड पोलीस ठाण्यांत आणले त्यांच्या कब्जांतून जवळपास ८४ लाखांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि कंटेनर जप्त केला. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व तळबीड पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून कौतुक