दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – दिनांक 14 ते 17 फेब्रुवारी मध्ये तालुका क्रीडा संकुल बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचा इयत्ता सातवी चा विद्यार्थी विक्रांत विश्वास खांडेकर यांने 35-40 किलो वजनगटात राज्यात तृतीय क्रमांक ब्रान्झ पदक मिळविले तसेच इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी कुमारी निरजा अंकित धोत्रे हिने25-30 किलो वजनगटात राज्यात तृतीय क्रमांक पदक ब्रान्झ मिळविले त्यांच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमारजी साळुंखे साहेब, सचिवा शुभांगीताई गावडे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभजी गावडे साहेब, आजीव सेवक श्री राम साळुंखे साहेब, रायगड विभाग प्रमुख आजीव सेवक प्राचार्य श्री हाके पी एल. म्हसळा शाळेचे चेअरमन समीर बनकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थ, पालक यांनी त्यांचे कौतुक केले, विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री मोरे एच बी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे