दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
कुणबी समाज संस्थापक माळी गुरुजींचा समाज जडण घडणीत मोलाचे योगदान आहेत.गुरुजींनी केलेले कार्य हे समाजाला महत्वपूर्ण दिशा देणारे आहे.त्यांनी समाजावर केलेले संस्कार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारे असल्याचे मत कुणबी समाज म्हसळा तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी माळी गुरुजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना व्यक्त केले.तालुक्यात समाजाचा काम करत असताना माळी गुरुजींचा आदर्श नेहमी आम्हा सर्व नेत्यांच्या डोळ्यासमोर उभे राहील त्यांनी समाजाला दिलेला वसा आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे मत व्यक्त केले.म्हसळा तालुका कुणबी समाज व कुणबी व्यापारी वाहतुक संघाकडून कुणबी संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गुणाजी माळी यांची १०३ वी जयंती सामाजिक सभागृहात साजरी करण्यात आली.यावेळी तालुका अध्यक्ष महादेव पाटील,तालुका चिटणिस गणेश बोर्ले,वाहतुक संघाचे अध्यक्ष महेश पवार,उपाध्यक्ष संतोष जाधव,चिटणिस दिपेश जाधव,दिलिप कोबनाक,अनंत अंबावले,महेंद्र धामणे,मंगेश मुंडे,प्रसाद बोर्ले,संजय गुलगुळे,किशोरी उंडे,स्वप्निल जाधव आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी गुरुजींना वंदन करण्यात आले.जयंती निमित्त तालुका सचिव गणेश बोर्ले,महेश पवार यांनी दिवंगत माळी गुरूजींच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या समाज कार्याची महती विशद केली.