दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- कंधार ते आंबुलगा, बोरी बु, कळका, वरवंट मार्गे पेठवडज नवीन एस.टी.चालु करण्याची खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे पेठवडज सर्कल मधील सामाजिक कार्यकर्ते यांनी मागणी केली आहे.१९९५ ला एस.टी.बस चालू होती.नतंरच्या काळात एस.टी.महामंडळाच्या गलथान कारभारामुळे बस बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे तरी नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार कळका नगरीचे भूमिपुत्र श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी मोदी सरकारने एस.टी.७५वर्षे पुर्ण केलेल्या नागरिकांना मोफत केले असून बस चालू करून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांची सोय करून सहकार्य करावे असे आवाहन श्री.व्यंकटी जाधव,श्री.पांडूरंग कंधारे, श्री.मोरलवार नामदेव, श्री.डावकोरे ज्ञानेश्वर, श्री.गजानन जाधव, श्री.प्रकाश टेबुलवार , श्री.शरद गायकवाड, श्री.बळीराम गायकवाड यांनी खासदार साहेबांना निवेदन देऊन बस चालू करण्याची मागणी केली आहे.