दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर:- अखंड भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून उस्माननगर ता.कंधार येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या देखाव्याने गावकऱ्यांचे मन वेधून घेत होते.
अश्वारूढ बाल छत्रपती शिवाजी महाराज, भालदार, चोपदार, चवरी, मावळ्यांच्या वेषभूषा साकारून लेझीम पथकाचे सादरीकरण उस्माननगर मधील सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवात रविवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांची मने जिंकली. यावर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या वतीने प्रथमच शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करवून शिवजन्मोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करुन गावकरी मंडळीच्या कौतुकास पात्र ठरले.
उस्माननगर येथील बसस्थानक परिसरात शिवजयंती साजरी होते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यी व शाळेतील सर्व शिक्षक याच्या कडून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख जयवंत
काळे, श्रीमती बांगे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय वारकड, सरपंच गयाबाई घोरबांड, ग्रामसवक श्रीमती शिंदे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक, मंडळाचे पदधिकारी ,जनसमुदाय मोठ्या संख्येनेउपस्थिती होते.
सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, सह शिक्षक देविदास डांगे, भगवान राक्षसमारे मन्मथ केसे
नितिन लाटकर, शकील शेख, समता जोंधळे, मणिषा भालेराव, सौ. सोनकांबळे सह सहकारी शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम सामुहिक सुट्टी असतानाही शिवाजी महाराजांचा देखावा सादर करून पालकांसह गावकरी व तरुणांची मने जिंकली सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या संकल्पनेतून रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून घोड्यावर बसून त्यांच्या संरक्षणासाठी मागे व पुढे राहणारे मावळे व शाळेतील लेझीम पथकाच्या देखाव्याने मनमोहरून सर्वांचे गेले होते .गावातील प्रमुख मार्गाने सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या गीतावर रॅली काढली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची छबी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी जागोजागी देखावा पहाण्यासाठी गर्दी केली होती.