दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी:आष्टी येथील नगरपंचायतीच्या ४ विषय समितीच्या सभापतीची निवडणूक पार पडली यात प्रभाग क्र.७ मधील नगरसेवक गौज खा याकुब खा यांची निवड सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी तर प्रभाग क्र.८ च्या नगरसेविका महिला व बालकल्याण सभापतीपदी यास्मिन अंजुम सिराज अहेमद तर याच समितीवर उपसभापती म्हणून बसपाच्या नगरसेविका अर्चनाताई विघ्ने यांची निवड झाली प्रभाग क्र६ च्या नगरसेविका रत्नमालाताई सुरपाम यांची शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती पदी वर्णी लागली आहे वरील तिन्ही सभापती हे कांग्रेस पक्षाचे प्रभागनिहाय नेतृत्व करतात तर जनशक्ती संघटनेच्या प्रभाग क्र.१३ च्या नगरसेविका सीमाताई निंबेकर यांची पाणीपुरवठा व जलनिसारण स्वच्छता वैधक तथा सार्वजनिक आरोग्य सभापती पदी निवड झाली आष्टी नगरपंचायत मध्ये काँग्रेस आणि जनशक्ती संघटनेत युतीचा फार्मूला असून यात काँग्रेस पक्षाचे ८ नगरसेवक असून जनशक्ती संघटनेचे ५ नगरसेवक आहे या दोन्ही पक्षांची नगरपंचायतच्या सत्तेमध्ये भागीदारी आहे सदर विषय समितीच्या सभापतीची निवड काँग्रेसचे माजी आ.अमर काळे व जनशक्ती संघटनेचे मकरंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून नवनिर्वाचित सभापतीचे नगराध्यक्ष अनिल धोत्रे व उपनगराध्यक्ष जनाब जाकीर हुसेन, गटनेता राहुल लाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे