दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
बलदंड बलवान शरीरयष्टी , सामर्थ्यशाली विवेक वैराग्य, पहाडी आवाज फक्त भगवंताला आळविणयासाठी , तेवढ्याच उंचीची तपश्चर्या, नावाला जागणारे कलीयुगातील महान नामधारक अंतःकरणात जड जिवाच्या उद्धारासाठी तळमळ नुसती तळमळ नाही तर त्यासाठी आपला देह झिजवणारे शेकडो गावात चार चार महिने चातुर्मास करुन भजन नाम साधना या मार्गाला लावून हजारो लोकांच्या जिवनात आनंद निर्माण करुन जिवन सफल करणारे, प्रेमाची मुर्तीमंत प्रेममूर्ती अतिशय डोंगर-दऱ्यात माळरान दुर्गम भाग असणाऱ्या गावागावात नामरुपी फुलाची बाग फुलवणारे अर्थात निरपेक्ष भावनेने अखंड हरिनाम सप्ताहची परंपरा, वारकरी संप्रदायात नामवंत, गुणवंत मृदंग वादक भजन गायक किर्तनकार प्रवचनकार निर्माण करणार व्यासपीठ, नुसतेच लोकांना घडवले नाही तर आपल्या वंशातील प्रत्येकजणाला हरिपाठ, भजन गायन मृदंग वादन किर्तन या क्षेत्रात कार्य तत्पर करणारे संत अनेक पायीवारी दिंडी सोहळा प्रथम चालु केले त्यापैकी श्रीसंत मोतिराम महाराज कार्तिकी पायी वारी फळा ते पंढरपूर आनंदवाडी ते पंढरपूर आषाढी-कार्तिकी वारी, दुर्गम भागात वारकरी भजनाची परंपरा विशेषतः गाथाभजन 4-4 तास करुन गाथाभजना विषयी सद्भावना जागृतीचे कार्य डोंगराळ जंगली भागात दर पंधरवाडी एकादशीनिमित्त स्वतः जाऊन भजन किर्तनाची परंपरा चालू केली.