दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील माहे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या वर्षात अतिवृष्टीच्या पुरामुळे व वीज पडून मृत्यू पावलेल्या मयत जनावरांच्या मालकांना शासकीय धनादेशाचे वाटप लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार अशोक मोकले, गोविंद पटणे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे ,खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, राजू पाटील कापसीकर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल ,संचालक सुधाकर सातपुते, शुभम कदम ,सिद्धू वडजे यांच्या प्रमुख उपस्थित होते.तालुक्यातील पिंपळगाव ढगे, कलंबर बु, हाडोळी ज, कापशी बु, जोशी सांगवी, बेरळी खुर्द, धावरी , किवळा , लोंढेसांगवी, अंतेश्वर, सुगाव, रिसनगाव , जोशीसांगवी येथे नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टीच्या पुरामुळे व विज पडून वरील गावातील 20 शेतकऱ्यांची जनावरे मयत झाली होती, त्यामुळे या मयत जनावरांच्या शेतमालकांना काल बुधवारी लोहा तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील वीस मयत जनावरांच्या मालकांना 6 लक्ष 30 हजार रुपयांचे धनादेशाचे वाटप लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.