
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
संदिप मोरे
5 नागरिकांना लस न घेता लिंक वर मिळाले पहिल्या- दुसऱ्या डोस चे प्रमाणपत्र
शहादा- शहरातील 5 नागरिकांना लस न घेता पहिल्या- दुसऱ्या डोस चे प्रमाणपत्र लिंकवर आल्याचे मोबाईलवर मेसेज आले आहे. यावरून लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी खोट्या पद्धतीने कोव्हीड-19 च्या लसीकरणाची चौकीशीची मागणी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी प्रांताधिकारी चेतन गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की,
जगभरात कोव्हीड- १९ व्हायरसने थैमान माजविले. त्यात आपला देशही व्यापला गेला, परंतु कोव्हीड- १९ ला हरविण्यासाठी आपल्या देशात सुद्धा युद्ध स्थरावर तयारी केली गेली व लसी तयार करणाऱ्या कंपन्यांनी अहोरात्र मेहनत घेवून कोव्हीड- १९ च्या महामारीला हरविण्याऱ्या कोव्हीशिल्ड व को-व्हॅक्सिन नावाच्या लसी तयार केल्या. त्या लसी संपूर्ण देशभरात सर्व नागरीकांना केंद्र शासना मार्फत मोफत दिल्या जाण्याची योजना आखली गेली. त्यातुनच लस घेण्यासाठी ऑन लाईन नोंदणीचे अत्याधुनिक सॉफ्टवेअर देखील आणले गेले व त्यातुन लस घेण्यासाठी पहीले ऑनलाईन नोंदणी करून नंतरच लसीचे पहीले व दुसरे डोस मिळतील असे जाहीर रित्या घोषणा करण्यात आली.काही महिन्यांपासुन पहिला डोस हा ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनच दिला गेला व ल घेतल्या नंतर प्रत्येक नागरीकाला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लस घेतल्याचा मेसेज अधिवृत्त रित्या दिला जातो. त्यातुनच देशाने १०० कोटी लसीकरण पुर्ण करण्याचा टप्पा देखील केला. केंद्र सरकारचे सदर उपक्रम खरच वाखाणण्याजोगे असून आम्हाला त्याचा अभिमान आहे.
परंतु त्याला आपला नंदुरबार जिल्हातील शहादा तालुका अपवाद आहे. येथे काही नागरीकांना कोव्हीड-१९ लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला नसल्यावरही अभिनंदन, आपण कोव्हीड- १९ चा कोव्हीशिल्ड लसीचा पहिला अथवा दुसरा डोस घेतला आहे. आपण आपले कोव्हीड-१९ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र https://cowin.gov.in-CoWIN या संकेतस्थळवरा जावून डाऊनलोड करु शकताअसे मेसेज नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आल्याने आश्चर्यचा धक्काच बसला आहे. डोस घेतला नसतांनाही असे मेसेज कसे काय येवू शकतात? जर का असेच खोटे मेसेज येत असतील आणि नुसत्या रजि. मोबाईल नंबरवर मेसेज टाकुन लसीकरणाचा टक्का तर वाढवला जात नाही ना? त्यानंतर ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांच्या नावे तुम्ही डोस घेतला म्हणुन मेसेज पाठविला गेला याचा अर्थ त्याला लसीचा दुसरा डोस मिळाला नाही म्हणून त्याचे आरोग्य ही धोक्यात येवू शकते. त्यानंतर त्याच्या नावावर झालेल्या लसीकरणाच्या लसीच्या व्हायलचे काय ? कारण सदर प्रमाणपत्रावर लसीच्या व्हायलचा सुद्धा बेंच नं. आलेला आहे. व त्यांना आपण लसींचे दोन्ही डोस घेतले असे प्रमाणपत्र सुद्धा संकेत स्थळावर दिले गेले आहे. अशा खोट्या पद्धतीने लाभार्थ्यांना लसीचे पहिले व दुसरे डोस घेतले नाहीत त्यांना मोफत लसीकरण करणे सुद्धा गरजेचे आहे. सदर बाब ही अत्यंत गंभिर असुन त्याची चौकशी होवुन व दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. सदर बाबीचा योग्य तो खुलासा लेखी स्वरुपात पाठपुरावा न झाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या सर्व परिणामास आपण जबाबदार राहाल याची कृपया आपण नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनसे चे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे,दिनेश नेरपागर, योगेश सोनार, दीपक लोहार, कौस्तुभ मोरे, सुहास पाटील, निलेश पाटील, गोपाळ कोळी, रविकांत सांजराज, अमेय राजहंस, दीपक जव्हेरी, यासिन शेखचांद, युसूफ रंगरेज, कल्पेश भोई आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.