दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-शहरातील रुक्मिणी नगर परिसरातील मराठा फ्रेंड्स क्लबच्या वतीने समस्त मराठा मावळ्यांच्या वतीने मराठा फ्रेंड्स क्लबच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्ताने मातीतला खेळ कबड्डी स्पर्धेचे सामने चांगलेच रंगले होते.पारंपरिक खेळाला महत्त्व देऊन ही कबड्डी स्पर्धा ६५ किलो वजनाच्या गटात घेण्यात आली असून यात एकूण २५ टीम सहभागी झाल्या होत्या.सामन्याची सुरुवात नगरसेविका जयश्रीताई डहाके,नगरसेविका नूतनताई भुजाडे,माजी जिल्हा परिषद सभापती जयंत देशमुख,श्याम गुल्हाने,विलासराव ठाकरे,उद्योजक नितीन डहाके,अजय देशमुख,डॉ.विश्वकर्मा,नंदलाल यादव,हेमंत गावंडे,संतोष चपटे,पंकज गुल्हाने,गिरीश उतखेडे,नरेश राऊत,अंकुश डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून “जय भवानी जय शिवाजी” या गजरात करण्यात आली.यावेळी नगरसेविका जयश्रीताई डहाके यांनी कबड्डी हा मातीतल्या पारंपारिक खेळाला मराठा फ्रेंड्स क्लबचे मावळे जोपासत आहे.ही गौरवाची बाब असल्याचे म्हटले व स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिल्या.स्पर्धेला माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिवून मंडळाच्या नवनवीन उपक्रमाचे कौतुक केले.स्पर्धेमध्ये अंतिम विजय संघ जगदंबा क्रीडा मंडळ चांदूरबाजार तर अंतिम उपविजयी संघ वीर केसरी क्रीडा मंडळ नांदगाव पेठ ठरला.
जगदंबा क्रीडा मंडळ चांदूरबाजार यांनी ४५ गुण तर वीर केसरी क्रीडा मंडळ नांदगाव पेठ २१ गुण यामध्ये जगदंबा क्रीडा मंडळ २४ गुणांनी विजयी झाला.तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू जगदंबा क्रीडा मंडळ चांदूरबाजार येथील अनुज चौधरी तर अंतिम सामन्यातील मॅन ऑफ मॅच म्हणून वीर केसरी क्रीडा मंडळ येथील ऋषिकेश तिवाडे यांनी मान मिळवला.स्पर्धेतील विजेता ठरलेल्या चमुंना प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये रोख,स्व.रोहित देशमुख,स्व.चंदन पाटील,स्व.बाबाराव चौधरी यांच्या स्मृती पित्यर्थ संतोष चपटे,नंदलाल यादव यांच्याकडून तर द्वितीय पारितोषिक स्व.मंदाताई विजयराव भोयर यांच्या स्मृती प्रित्यर्थ अजित विजयराव भोयर यांच्याकडून २१ हजार रुपये रोख तसेच बेस्ट रीडर बेस्ट कॅचेर बेस्ट ऑफ द मॅच फायनल व मॅन ऑफ द सिरीज व इतर वैयक्तिक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.स्पर्धा परीक्षकाचे काम सुरज पाटील,रमण पारधे,अक्षय वारे,सुरज मुंडे,धीरज गावंडे,अंकुश राऊत यांनी पाहाले.स्पर्धेचे संचालन पंकज गुल्हाने,राजेश कोराटे,उमेश भगत,शशिकांत बोंडे यांनी केले तसेच आभार भूषण डहाके यांनी मानले.स्पर्धेला मराठा फ्रेंड्स क्लबचे आजी-माजी खेळाडू तसेच मंडळाचे समस्त पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तीन दिवसीय झालेल्या या स्पर्धेला अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने सांगता करण्यात आली.