दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड- मुखेड उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दुर्बीण द्वारे बिनटाका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक २१/०२/२३ व २२/०२/२३ रोजी एकूण ८१ रुग्णांच्या दुर्बिनद्वारे बिनटाका (लेप्रोस्कोपी) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे मा. जिल्हाशल्यचिकित्सक नांदेड डॉ. भोसीकर सर, वैद्यकीय अधिक्षक डॉ किशोर कदम सर, डॉ. सुधाकर तहाडे वैद्यकीय अधिकारी, डॉ. रमेश गवाले तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडल्या. सर्व शस्त्रक्रिया सर्जन डॉ संतोष अंगरवार यांनी पार पाडल्या. या शिबिरासाठी श्रीमती पद्मा पांचाळ सिस्टर, श्रीमती पुंडे सिस्टर, श्रीमती बिजला फत्तेलष्कर सिस्टर, श्री योगेश पावरा ब्रदर, श्री माचनवाड, श्री नरोटे, श्री प्रशांत बनसोडे, श्री लखन पवार, श्री पी जी सगर ब्रदर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व उपजिल्हा रुग्णालय मुखेड वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.