दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -मीर मुल्ला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो,विशाखा समिती/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचा राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयामध्ये ‘महिला मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सौ.मनीषा मेने (तहसीलदार कळंब ) मा.सौ.शैला डोके (मुख्याधिकारी नगरपरिषद कळंब) हे होतो.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माँ साहेब जिजाऊंच्या व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाना वंदन करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक सौ.डॉ.शोभा पाटील यांनी या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या महिलांना संबोधित करताना त्यांचे आरोग्य विषयी समस्या व त्यावरील उपाय यासंबंधी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच समाजात महिलांवर होणाऱ्या अन्याय विरोधात कायदेशीर मार्गदर्शन केले.या महिला मेळाव्यात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.या खेळानी कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य,शशिकांत जाधवर (छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब) हे होते.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सौ.डॉ.शेळके मॅडम,सौ. डॉ.गायकवाड मॅडम, सौ.डॉ.कस्तुरकर मॅडम सौ.डॉ.गावडे मॅडम, सौ.सुनंदा कापसे, सौ.धनश्री कवडे, सौ.मीराताई चोंदे,सौ. संगीता घुले,सौ. शोभाताई खबाले, सौ.उषा कवडे,सौ.रुकसाना बागवान,सौ.कल्पना थोरात,सौ.दिपश्री वाघमारे तसेच कळंब शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर यांनी केले.प्रास्ताविक प्रा.सुनीता चोंदे व सूत्रसंचालन प्रा.मनीषा कळसकर यांनी केले. आभार प्रा.डॉ.विद्युलता पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.