दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -मीर मुल्ला
कुठलाही सण, उत्सव मनलं की पोलिस बंदोबस्त आलाच! सार्वजनिक कार्यक्रम म्हणलं की खाकी वर्दी आलीच..कालही अगदी अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचा गालबोट न लागू देता सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती चा आनंद घेता येईल; अशा पद्धतीने कळंब शहरातील पोलीस प्रशासन अगदी सज्ज होते.पोलिस प्रशासनाच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्व शहरास छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीचा आनंद घेता आला.
विशेषतः IPS एम.रमेश साहेब यांनी खासकरून वाहतूक कोंडी होऊ नये या करीता जे नियोजन केले होते ते विशेष वाखाण्याजोगे होते.याच प्रकारे कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पी.एस.आय.चाटे साहेब, पी.एस.आय. साबळे मॅडम यांनी देखील आपल्या सहकारी कर्मचाऱ्यास सोबत मिळून चोख बंदोबस्त ठेवला.यामुळे शहरातील एक सामाजिक संघटन म्हणून… जनतेच्या बंदोबस्ताचे 24 तास उभा असणारा आपला हा रक्षक व त्यांनी दिलेल्या या सेवेची कृतज्ञता म्हणून सर्व पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचे आपले मनःपूर्वक आभार मानावे.